अन्न धान्य कार्यालयाचा कारभार रामभरोसे, 'सपना'मुळे गोरगरीब वंचित ! नागरिक वैतागले नगर शहरामध्ये अन्न धान्य वितरण कार्यालयाचा भोेंगळ...
अन्न धान्य कार्यालयाचा कारभार रामभरोसे, 'सपना'मुळे गोरगरीब वंचित!
नागरिक वैतागले
नगर शहरामध्ये अन्न धान्य वितरण कार्यालयाचा भोेंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. कार्यालयातील अनेक तक्रारी येत असून अन्न धान्य वितरण कार्यालय कुठे आहे असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
अन्न धान्य वितरण कार्यालयामधून गोरगरिब नागरिकांसाठी अन्न धान्य मिळते. परंतु, सण उत्सवासाठी मिळणारे धान्य अद्यापही गरजू नागरिकांना मिळालेेले नाही. तसेच ऑनलाईन रेशनकार्डचेही सर्व्हर कायम डाऊन असते. दिवस दिवस ऑनलाईनची प्रोसेस होत नाही. अन्न धान्य वितरण कार्यालयातील अधिकारीही नागरिकांना दाद देत नाहीत. पराग बिल्डींगमध्ये असणारे कार्यालय राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाच्या समोरील इमारतीमध्ये आले खरे परंतु हे नारिकांना माहितच नाही. त्यामुळे अन्न धान्य वितरण कार्यालय कुठे आहे असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. अन्न धान्य कार्यालयाच्या बाहेरील बाजूस दर्शनी भागात नागरिकांना दिसेल असा बोर्ड लावणे अपेक्षित आहे. परंतु सर्व नियम ढाब्यावर बसवून पुरवठा अधिकारी 'सपना'चा कारभार नागरिकांच्या मुळावर असल्याचे समोर आले आहे. याबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी येत आहेत. त्यामुळे भोंगळ कारभार करणार्या संबंधित अधिकार्यांवर जिल्हाधिकारी कोणती कारवाई करतात याकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे.
COMMENTS