मुंबई : नेवासे पोलीस ठाण्याचे तत्कालीन व सध्या शेवगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब ज्ञानदेव नागरगोजे यांना जीव...
मुंबई : नेवासे पोलीस ठाण्याचे तत्कालीन व सध्या शेवगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब ज्ञानदेव नागरगोजे यांना जीवन रक्षा पदक जाहीर झाले आहे. सदरील पदक हे राष्ट्रपतींच्या शिफारशीने केंद्र शासनाकडून शौर्यपुर्ण कामगिरी केल्याल्याबद्दल पोलीस व कर्मचारी यांना दिले जाते.
बाळासाहेब ज्ञानदेव नागरगोजे हे नेवासे पोलिस ठाणे येथे नेमणुकीस असताना (ता. १२) डिसेंबर २०१८ रोजी अनिता धनसिंग परमेश्वर (वय ३५, रा. नेवासे खुर्द ता.नेवासे) हि महिला प्रवरा नदीच्या खोल पात्रात बुडत असताना जीवाची पर्वा न करता त्यांनी तिला मोठे शर्थीचे प्रयत्न करून पाण्यातून वर काढत प्राण वाचवले होते.
पोलीस कॉन्स्टेबल नागरगोजे यांना जीवन रक्षा पदक मिळाल्याबद्दल राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे, पोलीस निरीक्षक रणजित डेरे, शेवगावचे पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांनी अभिनंदन केले. कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून नागरगोजे यांचा लौकिक आहे.
COMMENTS