नवी मुंबई - महिलांच्या वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेचे यजमानपद महाराष्ट्राकडे देण्यात आले आहे. भारतीय कबड्डी महासंघाची वार्षि...
नवी मुंबई - महिलांच्या वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेचे यजमानपद महाराष्ट्राकडे देण्यात आले आहे.
भारतीय कबड्डी महासंघाची वार्षिक सर्वसाधारण बैठक ऑनलाइन स्वरूपात घेण्यात आली होती. या बैठकीत महाराष्ट्र राज्य कबड्डी महासंघाचे सरकार्यवाह अॅड. आस्वाद पाटील यांनी राज्याची दावेदारी सादर केली होती. परंतु गतवर्षी रोहा येथे पुरुषांची वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा महाराष्ट्रात झाली असल्याने यावेळी मात्र महिलांच्या राष्ट्रीय स्पर्धेचे यजमान देण्यात आले.
भारतीय कबड्डी महासंघाची वार्षिक सर्वसाधारण बैठकीत झालेले निर्णय पुढीलप्रमाणे -
उपकनिष्ठ गटाच्या दोन्ही स्पर्धा उत्तराखंडला होणार आहेत.
किनारी कबड्डीचे यजमानपद आंध्र प्रदेशला आणि सर्कल कबड्डीचे पंजाबला देण्यात आले आहे.
कनिष्ठ गटाच्या दोन्ही स्पर्धा तेलंगणला होणार आहेत. वरिष्ठ गटाची फेडरेशन चषक कबड्डी स्पर्धा विदर्भात आणि कनिष्ठ गटाची आसामला होईल.
पुरुषांच्या स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी उत्तर प्रदेशकडे देण्यात आली आहे.
COMMENTS